21 October 2020

News Flash

तरुणीच्या छेडछाडीवरून कृषी महाविद्यालयात वाद

व्हॅलेंटाईन डे, रोज डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे कार्यक्रम विद्यार्थ्यांंकडून आयोजित केले जात आहेत.

कोल्हापूर : तरुणीच्या छेडछाडप्रकरणी कारवाई होणार याचा अंदाज आल्याने संबंधित विद्यार्थ्यांने त्याच्या मित्रांसह  जमा होत घोषणाबाजी करण्याचा प्रकार येथील राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयात घडला.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, कृषी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन सध्या सुरु आहे. या काळात व्हॅलेंटाईन डे, रोज डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे कार्यक्रम विद्यार्थ्यांंकडून आयोजित केले जात आहेत. या दरम्यान पदवीच्या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या अमर नावाच्या विद्यार्थ्यांने बुधवारी महाविद्यालयातील एका मुलीला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. तिने ते न घेतल्याचा राग आल्याने अमरने अर्धे चॉकलेट खाऊन उर्वरित चॉकलेट मुलीच्या चेहऱ्यावर फेकले. हा प्रकार संबंधित  मुलीने आपल्या मावस भावाला सांगितला. सायंकाळी तरुणीचा भाऊ  महाविद्यालयात गेला. अमरला जाब विचारला. त्याने महाविद्यालयाच्या प्रमुखांकडेही तक्रार केली.

गुरुवारी तरुणीचा भाऊ  आणि आणखी एक तरुण असे दोघे महाविद्यालयात आले. त्यांनी शिक्षकांशी भेट घेतली. यावेळी आपल्यावर कारवाई होणार हे ओळखून अमरने अन्य विद्यार्थ्यांंना बोलावून आपल्या महाविद्यालात बाहेरचे तरुण  मारहाण करत असल्याचा कांगावा केला. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयाच्या आवारात घोषणाबाजी सुरू केली. याबाबत राजारामपुरी पोलिसांना समजल्यावर पोलीस निरीक्षक घुगे व इतर पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. शिक्षकांनी पोलिसांची समजूत काढून तेथून जाण्यास सांगितले. यानंतर महाविद्यालयातील शिक्षकांची सायंकाळी चार वाजेपर्यत ही बैठक सुरू होती.

दरम्यान विद्यार्थिनीची छेड काढण्याचा जो प्रकार घडला त्याचे कोणी समर्थन करून शकत नाही. याबाबत चौकशी सुरू आहे. दोषी व्यक्तीवर कायदेशिर कारवाई केली जाईल,असे प्रभारी प्राचार्य एस.आर. शिंदे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:10 am

Web Title: women agricultural colleges crime news danger news akp 94
Next Stories
1 ‘व्हॅलेंटाइन डे’साठी शिरोळच्या गुलाबाला जगपसंती!
2 दिल्ली विजयाचा कोल्हापुरात ‘आप’कडून जल्लोष
3 ग्रामीण भागातील बांधकाम परवाने आता पुन्हा स्थानिक पातळीवर
Just Now!
X