गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक श्रीमती वैशाली अण्णासाो कांबळे (वय ३४, सध्या रा. जुनी पोलिस कॉलनी, मूळ रा. अब्दुललाट) हिला लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड व पोलिस नाईक विष्णू शिंदे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा पोलिसच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

इचलकरंजी पोलिस ठाण्याच्या परिसरातील लाखेनगर जाधवमळा भागात राहणाऱ्या श्रीमती रेखा अनिल देसाई यांच्या मुलाच्या विरोधात गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. या तक्रारीमध्ये मुलांवर कारवाई न करण्यासाठी पोलिस नाईक कांबळे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात देसाई यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची बुधवारी सकाळी पंच साक्षीदारांच्या समक्ष पडताळणीया संदर्भात देसाई यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती.ही करण्यात आली. ठरल्याप्रमाणे  गावभाग पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या चहाच्या गाड्यावर देसाई यांच्याकडून लाच स्वीकारताना सापळा रचलेल्या पथकाने कांबळे हिला रंगेहाथ पकडले.