18 November 2017

News Flash

कोल्हापूरमध्ये ६७ गटांसाठी ३२२ उमेदवार रिंगणात

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: March 7, 2017 11:57 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी ३२२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी ५८३ उमेदवार निवडणूक िरगणात उभे असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. ना

मनिर्देशनपत्रे माघार घेतल्यानंतर आज जिल्हा परिषदेसाठी ३२२ उमेदवार निवडणूक िरगणात असून, त्यांची तालुकानिहाय माहिती अशी. शाहूवाडी तालुका-१५, पन्हाळा तालुका २९, हातकणंगले तालुका ५५, शिरोळ-३३, कागल २३, करवीर ६६, गगनबावडा ९, राधानगरी २०,  भुदरगड-२१, आजरा ८, गडिहग्लज २० आणि चंदगड तालुक्यात २३ उमेदवार आहेत. तर पंचायत समितीसाठी ५८३ उमेदवार निवडणूक िरगणात असून, त्यांची तालुकानिहाय माहिती अशी. शाहूवाडी तालुका-२४, पन्हाळा तालुका ५०, हातकणंगले तालुका १०६, शिरोळ-५७, कागल ३९, करवीर ९९, गगनबावडा १५, राधानगरी ४६, भुदरगड-४२, आजरा २४, गडिहग्लज ४६ आणि चंदगड तालुक्यात ३५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

First Published on February 15, 2017 1:39 am

Web Title: zp election2017 in kolhapur