कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनर ट्रक मधील ११ लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मध्याचा साठा जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली आहे.

गोवा राज्यातून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असते. आज अशा प्रकारची वाहतूक करणारा एक कंटेनर ट्रक पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जाणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना मिळाली होती.त्यांनी तपास पथक तैनात केले. किणी टोल नाक्याजवळ माहितगाराकडून मिळालेला ट्रक कंटेनर किनी आला. तो बाजूला घेऊन चौकशी केली असता ट्रक चालकाने आत केमिकलचे बॉक्स असल्याचे सांगितले.पोलिसांनी त्याचे बिल मागितले. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
farmers deprived of help during congress government says pm narendra modi
काँग्रेसकाळात शेतकरी मदतीपासून वंचित; शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांची टीका
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
in pune Gavathi liquor making in Nursery
पुण्यातील रोपवाटिकेत गावठी दारूचा अड्डा

ट्रकची तपासणी केली असता आत ३९४ गोवा बनावटीचे बॉक्स आढळले. पोलिसांनी पंचनामा करून १४ लाख रुपयांचा मद्याचा साठा तसेच कंटेनर ट्रक्स असा ३० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी इब्राहिम हकीम खान (वय २२) व सत्तार मिठू खान (वय २७, दोघे रा. आत्मज, जिल्हा जालोर, राजस्थान) यांना अटक केली आहे.