कोल्हापूर: गोवा बनावटीचा अकरा लाखाचा बर्थडे साठा जप्त; दोघे अटक | 11 lakh Goa fake birthday stock seized two arrested amy 95 | Loksatta

कोल्हापूर: गोवा बनावटीचा अकरा लाखाचा मद्याचा साठा जप्त; दोघे अटक

कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनर ट्रक मधील ११ लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मध्याचा साठा जप्त केला.

कोल्हापूर: गोवा बनावटीचा अकरा लाखाचा मद्याचा साठा जप्त; दोघे अटक
गोवा बनावटीचा अकरा लाखाचा मद्याचा साठा जप्त

कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनर ट्रक मधील ११ लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मध्याचा साठा जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली आहे.

गोवा राज्यातून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असते. आज अशा प्रकारची वाहतूक करणारा एक कंटेनर ट्रक पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जाणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना मिळाली होती.त्यांनी तपास पथक तैनात केले. किणी टोल नाक्याजवळ माहितगाराकडून मिळालेला ट्रक कंटेनर किनी आला. तो बाजूला घेऊन चौकशी केली असता ट्रक चालकाने आत केमिकलचे बॉक्स असल्याचे सांगितले.पोलिसांनी त्याचे बिल मागितले. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

ट्रकची तपासणी केली असता आत ३९४ गोवा बनावटीचे बॉक्स आढळले. पोलिसांनी पंचनामा करून १४ लाख रुपयांचा मद्याचा साठा तसेच कंटेनर ट्रक्स असा ३० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी इब्राहिम हकीम खान (वय २२) व सत्तार मिठू खान (वय २७, दोघे रा. आत्मज, जिल्हा जालोर, राजस्थान) यांना अटक केली आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2022 at 18:39 IST
Next Story
वस्त्रोद्योगावर अस्थिरतेचे सावट