कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. नवीन औद्योगिक वसाहती स्थापन करणे, आयटी पार्क उभारणीसह सर्वंकष धोरण बनवून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज तर्फे जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांनी उद्योग मंत्र्यांसमवेत संवाद बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्योजक विजय मेनन, प्रकाश राठोड, सुरेंद्र जैन, सचिन मेनन, प्रसाद मंत्री, भरत जाधव, आनंद देशपांडे, अजय सप्रे, सचिन शिरगांवकर आदींनी उद्योग विस्तारीकरणासाठी जागा, विजेची उपलब्धता, आयटी पार्क उभारणी, कोल्हापूर-सांगली विभागाला ‘फाऊंड्री हब’ घोषित करण्याची मागणी केली.

हेही वाचा – जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी औद्योगिक वसाहतींचे प्रलंबित प्रश्‍न सोडवल्याबद्दल, उद्योजकांचे प्रलंबित अनुदान वितरीत केल्याबद्दल उद्योग मंत्र्यांना धन्यवाद देऊन हस्तांतरणावरील जीएसटी मागणी रद्द करणे, इलेक्ट्रॉनिक पार्कला मंजुरी आदी मागण्या मांडल्या.

हेही वाचा – महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा

मंत्री सामंत म्हणाले, कोल्हापुरात नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाईल. आचारसंहितेनंतर विविध निर्णय जाहीर केले जातील.