प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की, एकेरी उल्लेख, शाब्दिक वादावादी अशा प्रकारामुळे सभेत गदारोळ उडाला. पाच तासाहून अधिक काळ चाललेल्या सभेत एकमेकांचे रेवडी उडवण्याचा प्रकार उपस्थित शिक्षकांना पाहण्याची वेळ आली होती.शिक्षक बँकेत नुकतेच सत्तांतर झाले असले तरी सभेतील गोंधळाचे परंपरा मागील पानावरून पुढे सुरू राहिल्याचे आजही दिसून आले. बँकेचे अध्यक्ष अर्जुन यांनी मागील संचालकांच्या गैरकारभारामुळे लाभांश देता येत नाही याचे दुःख असल्याचे नमूद करतानाच दिवाळी सणासाठी सहामाही ठेवीवरील व्याज रक्कम देण्यात येणार आहे, असा उल्लेख केल्यावर सभासदांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

हेही वाचा >>> ठरले तर! कोल्हापूर जिल्ह्यात यंदा एकरकमी एफआरपी; शेतकरी संघटनांना तलवार म्यान करावी लागणार

vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…
bachchu kadu shinde fadnavis
“…त्या गोष्टीचा बदला घेतला पाहिजे, त्यांना दणका देणार”, बच्चू कडूंचा महायुतीविरोधात शड्डू? लोकसभेला उमेदवार उभे करणार?

सत्तारूढआघाडीचे नेते ज्योतीराम पाटील हे उत्तरे देऊ लागल्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. पाटील यांनी ‘ तुमचे राज्य संपले. खाली बसा . अशा शब्दात आव्हान दिल्याने विरोधकांनी सभेच्या अध्यक्षांनी बोलावे, इतरांनी मध्ये तोंड घालू नये अशा शब्दात खडसावले. त्यावरून जोरदार गोंधळाला सुरुवात झाली. माजी संचालकांना धक्काबुक्की, अरेरावीची भाषा, प्रचंड घोषणाबाजी यामुळे सभेचा आखाडा निर्माण झाला.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम यांनी मागील संचालकांनी दाखवलेला २ कोटी ३८ लाखाचा नफा खोटा असल्याचा उल्लेख करतांच विरोधकांनी आक्षेप घेतला. नफा खोटा असेल तर लाभांश देण्यास परवानगी कशी मिळाली, लेखापरीक्षकांनी तो मान्य कसा केला ? असा शब्दात फैलावर घेतले. त्यातून पुन्हा उभय गटात खडाजंगी उडाली.

अध्यक्ष पाटील यांनी मागील संचालक मंडळाच्या कारभाराचा पाढा वाचून दाखवण्यास सुरुवात केल्यावर पुन्हा गोंधळ माजला. ध्वनिक्षेपक न मिळाल्याने माजी संचालक प्रसाद पाटील यांनी ‘ आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, चुकीची माहिती दिली तर फौजदारी दाखल करू ‘ असा इशारा दिला. त्यावर धक्काबुक्कीला सुरुवात झाली. काहींनी पाण्याच्या बाटल्या सभेत भिरकावल्या.

गुरुजींचे व्याकरण कच्चे
बँकेच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर राजर्षी हा शब्द राजर्षि असा चुकीचा छापला आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष १९२२-२२ असे असताना अहवालात १९०२ -२०२२ असे छापले आहे. त्यावरून विरोधी आघाडीचे संभाजी बापट, बाजीराव कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांची हजेरी घेतली. अध्यक्ष पाटील यांना चूक झाल्याचे मान्य करत माफी मागावी लागली.