कोल्‍हापूर प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेचा आखाडा; धक्काबुक्की, वादावादीने गालबोट | A heated debate at the Annual General Meeting of the Primary Teachers Cooperative Bank amy 95 | Loksatta

कोल्‍हापूर प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेचा आखाडा ; धक्काबुक्की, वादावादीने गालबोट

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की, एकेरी उल्लेख, शाब्दिक वादावादी अशा प्रकारामुळे सभेत गदारोळ उडाला.

कोल्‍हापूर प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेचा आखाडा ; धक्काबुक्की, वादावादीने गालबोट
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की, एकेरी उल्लेख, शाब्दिक वादावादी अशा प्रकारामुळे सभेत गदारोळ उडाला

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धक्काबुक्की, एकेरी उल्लेख, शाब्दिक वादावादी अशा प्रकारामुळे सभेत गदारोळ उडाला. पाच तासाहून अधिक काळ चाललेल्या सभेत एकमेकांचे रेवडी उडवण्याचा प्रकार उपस्थित शिक्षकांना पाहण्याची वेळ आली होती.शिक्षक बँकेत नुकतेच सत्तांतर झाले असले तरी सभेतील गोंधळाचे परंपरा मागील पानावरून पुढे सुरू राहिल्याचे आजही दिसून आले. बँकेचे अध्यक्ष अर्जुन यांनी मागील संचालकांच्या गैरकारभारामुळे लाभांश देता येत नाही याचे दुःख असल्याचे नमूद करतानाच दिवाळी सणासाठी सहामाही ठेवीवरील व्याज रक्कम देण्यात येणार आहे, असा उल्लेख केल्यावर सभासदांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

हेही वाचा >>> ठरले तर! कोल्हापूर जिल्ह्यात यंदा एकरकमी एफआरपी; शेतकरी संघटनांना तलवार म्यान करावी लागणार

सत्तारूढआघाडीचे नेते ज्योतीराम पाटील हे उत्तरे देऊ लागल्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. पाटील यांनी ‘ तुमचे राज्य संपले. खाली बसा . अशा शब्दात आव्हान दिल्याने विरोधकांनी सभेच्या अध्यक्षांनी बोलावे, इतरांनी मध्ये तोंड घालू नये अशा शब्दात खडसावले. त्यावरून जोरदार गोंधळाला सुरुवात झाली. माजी संचालकांना धक्काबुक्की, अरेरावीची भाषा, प्रचंड घोषणाबाजी यामुळे सभेचा आखाडा निर्माण झाला.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम यांनी मागील संचालकांनी दाखवलेला २ कोटी ३८ लाखाचा नफा खोटा असल्याचा उल्लेख करतांच विरोधकांनी आक्षेप घेतला. नफा खोटा असेल तर लाभांश देण्यास परवानगी कशी मिळाली, लेखापरीक्षकांनी तो मान्य कसा केला ? असा शब्दात फैलावर घेतले. त्यातून पुन्हा उभय गटात खडाजंगी उडाली.

अध्यक्ष पाटील यांनी मागील संचालक मंडळाच्या कारभाराचा पाढा वाचून दाखवण्यास सुरुवात केल्यावर पुन्हा गोंधळ माजला. ध्वनिक्षेपक न मिळाल्याने माजी संचालक प्रसाद पाटील यांनी ‘ आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, चुकीची माहिती दिली तर फौजदारी दाखल करू ‘ असा इशारा दिला. त्यावर धक्काबुक्कीला सुरुवात झाली. काहींनी पाण्याच्या बाटल्या सभेत भिरकावल्या.

गुरुजींचे व्याकरण कच्चे
बँकेच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर राजर्षी हा शब्द राजर्षि असा चुकीचा छापला आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष १९२२-२२ असे असताना अहवालात १९०२ -२०२२ असे छापले आहे. त्यावरून विरोधी आघाडीचे संभाजी बापट, बाजीराव कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांची हजेरी घेतली. अध्यक्ष पाटील यांना चूक झाल्याचे मान्य करत माफी मागावी लागली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठरले तर! कोल्हापूर जिल्ह्यात यंदा एकरकमी एफआरपी; शेतकरी संघटनांना तलवार म्यान करावी लागणार

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक