कोल्हापूर : कागल तालुक्यातील एका घरामध्ये अतिविषारी मानल्या जाणारा घोणस जातीचा साप शनिवारी आढळला. घोणसने ७० पिलांना जन्म दिला आहे. सर्पमित्रांनी त्यांना जंगल अधिवासात सोडून जीवदान दिले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादी पाठोपाठ कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचाही दावा

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना

कुर (ता. कागल) येथील बाजीराव मिसाळ यांच्या घरामध्ये साप शिरला होता. कुटुंबियांनी याची माहिती दिल्यानंतर सर्पमित्र सयाजी चौगुले यांनी तो साप पकडला. घोणस जातीची मादी असून तिने ७० पिलांना जन्म दिल्याचे दिसून आले. घोणससह सर्व पिल्लांना जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले. चौगुले यांनी आजवर तीन हजारांवर विषारी, बिनविषारी साप पकडून अधिवासात सोडून दिले आहे.