scorecardresearch

Premium

कोल्हापूरला रुग्णाधार; ११०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता, हसन मुश्रीफ यांची माहिती

शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

hospital in Kolhapur
कोल्हापूरला रुग्णाधार; ११०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता, हसन मुश्रीफ यांची माहिती (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

कोल्हापूर: येथील शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित शहा उद्घाटक

यावेळी मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. लवकरच एकूण अकराशे बेडच्या सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक अशा या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे. शासन स्तरावरील ४५१ कोटींच्या तिन्ही स्वतंत्र प्रशासकीय मान्यता नुकत्याच मिळाल्या आहेत.

नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..
Clear way for examination of 12th answer sheet Boycott withdrawn after discussions with Education Minister
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर बहिष्कार मागे
JEE Mains result announced
‘जेईई मेन्स’चा निकाल जाहीर, राज्यातील किती विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल?
much awaited report of the Loom Industry Study Committee is presented
यंत्रमाग उद्योग अभ्यास समितीचा बहुप्रतीक्षेत अहवाल सादर; कुतूहल वाढले

हेही वाचा – अवकाळी पावसाने कोल्हापूरला पुन्हा झोडपले

एक हजार कोटीचा खर्च

तसेच हॉस्पिटलमधील सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल – दुरुस्ती यांच्या निधीसाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. इमारतींची बांधकामे पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा-सुविधा आणि परिसर सुधारणांसह या कामांवर एक हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होणार आहेत.

याचेही उद्घाटन

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वसतिगृह या पाच इमारती ५८ कोटी निधीच्या खर्चातून पूर्णत्वाला आलेल्या आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

हेही वाचा – कोल्हापुरातील दोन जनऔषधी केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

अशा मिळणार सुविधा

  • एकूण ३० एकरांत अकराशे बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल /आरोग्य संकुल
  • न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
  • निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरुष वसतिगृह-क्षमता २५०
  • निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वसतिगृह- क्षमता २५०
  • मुलींचे वसतिगृह- क्षमता १५०
  • मुलांचे वसतिगृह – क्षमता १५०
  • परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३००
  • सेंट्रल लायब्ररी
  • परीक्षा भवन- क्षमता ४००
  • अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण

सर्वोच्च समाधान – मुश्रीफ

याबाबत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. माझ्या जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे कॅन्सरचे उपचारही कोल्हापुरातच मिळतील. तसेच पुण्या-मुंबईला जाऊन करावे लागणारे हृदय, यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यासारखे विशेषोपचारही रुग्णांना कोल्हापुरातच मिळतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Administrative approval for 1100 bed state of the art hospital in kolhapur information from hasan mushrif ssb

First published on: 30-11-2023 at 21:14 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×