कोल्हापूर : राज्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शाळांना १ जानेवारी २०२४ पासूनच अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा या मागणीसाठी या शाळांतील शिक्षकांनी १० वी,१२ वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती राज्य समन्वयक  खंडेराव जगदाळे यांनी सोमवारी दिली.

ते म्हणाले की, राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षक संघटना एकत्र येऊन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदानावर ३ जानेवारी पासून आज अखेर आंदोलन सुरू आहे. गेले ५५ दिवस आंदोलन सुरू असताना देखील सरकारने या आंदोलन कडे हेतूुरस्सर दुर्लक्ष केले असल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घेतला आहे.

kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

हेही वाचा >>>कोल्हापूर: अंबाबाई मूर्तीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नोव्हेंबर महिन्यातील आंदोलन वेळी स्वतः मैदानात येऊन आंदोलनकर्ते शिक्षक यांना मिठाई भरवत तुमच्या सर्व मागण्या मान्य आहेत, असे अभिवचन दिले होते. परंतु नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी शब्द फिरवला. अन् त्याचमुळे गेले ५५ दिवस झाले आझाद मैदानात आमचे आंदोलन सुरू आहे.

जोपर्यत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत राज्यातील सर्व विनानुदानित तथा अंशतः अनुदानित शिक्षकांचा बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार असेल.याबाबत संपूर्ण राज्यभरात निवेदने देण्यात आली आहेत.

 पुढील टप्पा

अनुदानाचा निर्णय होत नाही तो पर्यंत कसल्याही परिस्थितीत पेपर तपासले जाणार नाहीत, असे शासनास कळविले आहे, असे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.