कोल्हापूर : सोने दरामध्ये वाढ झाली असतानाही आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापुरात सोन्याची खरेदी उत्साहाने करण्यात आली. आंब्याचे दर आवाक्यात आले असल्याने त्याचा स्वाद आनंदाने घेतला गेला.

साडेतीन मुहूर्तामध्ये अक्षय तृतीया सणाचा समावेश असतो. या मुहूर्तावर नव्या वस्तूची खरेदी झाली की घरात अक्षय समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते गेले.

हेही वाचा…श्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या तुपाची चव

अलीकडे सोन्याचा दर प्रति तोळे ७५ हजार रुपयांवर गेला होता. तो ७० हजारावर आला पण पुन्हा ७३ हजारावर गेला. सोने दरामध्ये अशी वाढ झाली असली तरी मुहूर्ताची संधी साधत सोने खरेदी करण्यासाठी गुजरी पेठ, सराफी बाजारामध्ये गर्दी झाली होती. दिवसभर ग्राहकांनी उत्साहाने खरेदी केली, असे सराफ अमित शहा यांनी सांगितले. दरम्यान, आज चार चाकी, दुचाकी वाहने, गृहोपयोगी वस्तू याची खरेदीही जोमाने झाली.