कोल्हापूर : २०१९ सालच्या निवडणुका शिवसेनेने भाजपशी युती करून लढवल्या होत्या. निकालानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. तत्त्व सोडून मुख्यमंत्री होण्यासाठी ते शरद पवार यांच्याबरोबर गेले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांना धडा शिकवला आहे, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी टीकास्त्र सोडले.

भाजपच्या वतीने कोल्हापुरात विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. गतवेळच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन शहा म्हणाले, मागील निवडणूक एकत्रित लढवली होती. प्रचार सभेमध्ये मोदी यांचा फोटो मोठा आणि उद्धव ठाकरे यांचा छोटा होता. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून मोठे यश मिळाले. तत्त्वाशी प्रतारणा करणाऱ्यांना भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून धडा शिकवला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, सत्तेसाठी त्यांना खुर्ची महत्त्वाची वाटली आणि विरोधकांशी संसार थाटला. काळाचा महिमा असा की असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश