कोल्हापूर : सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा देण्यात येतो.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारपासून शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे सोमवारी सांगण्यात आले.

हेही वाचा >>>कोल्हापूर- मुंबई वंदे भारतसाठी प्रयत्नशील; रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचे आश्वासन

सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, संस्थापक सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांच्या समितीने ही निवड केली. या पुरस्कार निवडीचे पत्र आमदार आवाडे यांना सहकार भारती कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ॲड. जवाहर छाबडा, जिल्हा महामंत्री धोंडीराम पागडे, प्रदेश महिला संस्था प्रकोष्ट प्रमुख वैशाली आवाडे यांनी दिले.