कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी उपस्थिती लावल्याने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांना धक्का बसला आहे. शिवाय, मेहुण्या – पाहुण्यांमध्ये राजकीय वितुष्ट आल्याचेही नव्याने समोर आले आहे.बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदार घडामोडी सुरू आहेत. राजर्षी शाहू शेतकरी आघाडी म्हणून ही निवडणूक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समविचारी मंडळी एकत्र आलो असल्याचे यावेळी खासदारधनंजय महाडिक यांनी सांगितले.
समरजितसिंह घाटगे यांनी यापूर्वी मंडलिक – घाटगे गट आधी पासून एकत्रित आला होता. आता पुन्हा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलो असल्याने सत्ताबदल नक्की होईल, असा विश्वास व्यक्त केला.ए. वाय. पाटील यांनी गेली दहा वर्षे कारखान्याचा कारभार अक्षम होता. त्यामध्ये अनेक दोष होते. कारखान्यात पारदर्शक व्यवस्थापन यावे यासाठी या आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.



