प्रतापगड येथे साजऱ्या होणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या प्रशासनाने १७ ते २० डिसेंबर या कालावधीसाठी सातारा जिल्हा बंदी हुकूम बजावला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आ. नितीन शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफझलखान कबर आणि अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन हाती घेतले आहे. यामुळेच आपणास ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा प्रतापगडावर शिवप्रताप दिन १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे.  हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २००३ पर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र अनधिकृत बांधकामाबाबत आंदोलन सुरू झाल्यानंतर २००४ पासून राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी शिवप्रतापदिन साजरा करण्यात येत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व केले असल्यामुळेच साताऱ्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजीव देशमुख यांनी जिल्हा बंदी हुकूम बजावला असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.