कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथे पशू-पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी घालणारा आदेश पुरातत्त्व विभागाने लागू केला आहे. शाहूवाडीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, दारु आणि गांजा विक्री तसेच सेवन करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला प्रतिबंध करण्याची मागणी होत होती.
त्यास अनुसरून संरक्षित स्मारकाच्या क्षेत्रात पशुपक्षी हत्या करून त्यावर प्रक्रिया करता येणार नाही असे एका शासन आदेशात नमूद केले आहे. मुंबई
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archeology department order banning killing and cooking of animals and birds at vishalgad fort zws