कोल्हापूर : किल्ले पन्हाळगडाची स्वच्छता करीत असताना अंधारबाव ते तीन दरवाजा तटबंदी मध्ये तोफेचा लोखंडी गोळा आढळला. सुमारे पावणेतीन किलोचा हा गोळा असून तो पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

किल्ले पन्हाळगडाची स्वच्छता दुर्ग सेवा प्रतिष्ठान, टोप कासारवाडी येथील शिवप्रेमी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने करीत असतात. स्वच्छतेचे काम सुरू असताना अंधारबाव ते तीन दरवाजा तटबंदीमध्ये तोफेचा लोखंडी गोळा कार्यकर्त्यांना आढळला. प्रत्यक्ष मारा झालेल्या ठिकाणी तटबंदीमध्ये तोफेचा गोळा आढळणे हे विशेष बाब असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Stolen pipe connections to illegal buildings in Dombivli man arrested including plumber
डोंबिवलीत बेकायदा इमारतींना चोरीच्या नळजोडण्या, प्लंबरसह मध्यस्थ अटकेत

पर्णाल इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी सिद्धी जोहर, औरंगजेबाने तसेच नंतरच्या काळात ही अनेकदा पन्हाळगडावर तोफेचा मारा झाला होता. त्यातीलच हा अंश असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत सखोल संशोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर रोहन चेचरे, संग्राम लोखंडे, सौरभ मुळीक, प्रतीक शिंदे, ओंकार जाधव, ऋषिकेश कुशिरे, सागर कोळेकर, गौरव शिंदे, विकी भोसले, बारक्या सुतार, सौरभ पवार आदी कार्यकर्त्यांनी हा तोफगोळा पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द केला.