कोल्हापूर : ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे जुने मराठी चित्रपट प्रेक्षकांना मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. राज्यभरात असे कार्यक्रम होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी येथे केली.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘चित्रसूर्य’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार अमल महाडिक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, सूर्यकांत मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य, नागरिक, श्रोते उपस्थित होते.
आठवणींना उजाळा
‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातील संहिता लेखन, संशोधन डॉ. सुवर्णा चवरे, संगीत संयोजन कमलेश भडकमकर, निवेदन सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख यांनी केले. सूर्यकांत मांढरे यांनी मराठी चित्रपटासाठी दिलेल्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली. सुरेल मराठी गाणी सादर करण्यात आली.