कोल्हापूर: राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी पुनश्च अशोक स्वामी | Ashok Swamy as President of State Textile Federation amy 95 | Loksatta

कोल्हापूर: राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी पुनश्च अशोक स्वामी

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक मल्लय्या स्वामी यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली आहे.

कोल्हापूर: राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी पुनश्च अशोक स्वामी
राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी पुनश्च अशोक स्वामी आणि उपाध्यक्षपदी सविता विठ्ठलराव सोनखेडकर

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अशोक मल्लय्या स्वामी यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सविता विठ्ठलराव सोनखेडकर यांची निवड करण्यात आली.

राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संचालक मंडळामध्ये अशोक मल्लय्या स्वामी, दिलीप अमृतलाल मुथा, सुनिल महारुद्र तोडकर, पृथ्वीराज सयाजीराव देशमुख, रणजित धैर्यशील देशमुख, बाबाराव साहेबराव पाटील, राजशेखर विरुपाक्ष शिवदारे, राहुल नानासाहेब महाडीक,प्रा. किसनराव विठ्ठलराव कुराडे, वीरेंद्र हरिभाऊ गजभिये, सविता विठ्ठलराव सोनखेडकर (गायकवाड), रोहिणी प्रांजल खडसे-खेवलकर, अशोकराव कोंडीबा माने, चंद्रकांत प्रभाकर बडवे, विश्वनाथ तुकाराम मेटे यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या बेलार्ड इस्टेट मुंबई येथील कार्यालयात अध्यासी अधिकारी अविनाश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून त्यामध्ये ही निवड करण्यात आली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2022 at 21:58 IST
Next Story
“डोळ्याला पाणी लाऊन म म म्हणणारे हिंदुत्व….”, सुषमा अंधारेंनी ठणकावून सांगितलं; फडणवीस, केसरकरांना ही केलं लक्ष