scorecardresearch

युवा वर्गाचे आकर्षण भाजपाकडे – चंद्रकांत पाटील

आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे विविध क्षेत्रांतील स्थान शिखरावर नेले आहे.

भाजयु मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वितरण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे विविध क्षेत्रांतील स्थान शिखरावर नेले आहे. देशात नव-नवीन योजनांच्या माध्यमातून रोजगार, उद्योगासाठी भांडवल व इतर सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. परिणामी युवा वर्गाचे आकर्षण भाजपाच्या दिशने वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

  भारतीय जनता युवा मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रवेश व नियुक्ती पत्र वितरण आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपाला दुप्पट, ७८ हजार पेक्षा जास्त मते मिळवण्यात यश आले आहे. लोकांचा कल भाजपाकडे वळत आहे. भाजपाचे सध्याचे अनेक दिग्गज नेते हे भाजपा युवा मोर्चा मधूनच मोठय़ा स्तरावर पोहोचले आहेत. याचाच आदर्श समोर ठेवून नूतन पदाधिकारी काम करतील असा विश्वास आहे. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील यांनी कार्याचा आढावा घेतला. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attraction youth bjp chandrakant patil location peaks different areas new plans employment ysh