यावर्षीचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष वकील अशोकराव साळोखे, कार्याध्यक्ष प्राचार्य टी. एस. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. २८ मे रोजी येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते होणार आहे. होणार आहे. रोख पाच हजार रुपये, शाल, फेटा, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. परिवर्तनवादी चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल बागल विद्यापीठातर्फे १९९२ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. वसंत भोसले यांच‌‌ निर्भीड पत्रकार-संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. पत्रकारितेतील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध