सध्या राज्यातील भाजप सरकारच्या बनवाबनवीच्या कारभारामुळे सामान्य जनतेबरोबर शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकरी विकासाचा मुद्दा राहिलेला नसून सामान्य जनता, शेतकरी हे वंचित राहिले आहेत, अशी  टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.  िदडनेर्ली (ता. करवीर) येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी यंदाचा भारतरत्न राजीव गांधी सद्भावना पुरस्कार पद्मश्री कुमार केतकर यांना थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची सद्भावना दौड नेटक्या नियोजनाने पार पडली.

मोदींचा बलिदान वक्तव्याचा थोरात यांनी समाचार घेतला.  प्रसिद्धी आणि फसव्या घोषणा करणाऱ्या सेना-भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका करून आमदार सतेज पाटील म्हणाले, निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणा गेल्या कुठे, असा सवाल उपस्थित केला.स्वागत सूतगिरण अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.  सर्वानी हातात-हात घालून येणाऱ्या जि.प.स. निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकविण्याच्या कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन राजेखान शहानेदिवाण यांनी तर आभार बाळासाहेब खाडे यांनी मानले.