बिस्नोई टोळीचा गुंड मोहित मलिक अटक; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

मल्ल असल्याची ओळख दाखवून कोल्हापुरात राहणाऱ्या कुख्यात गुंडास मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

bishnoi gang
बिस्नोई टोळीचा गुंड मोहित मलिक अटक

कोल्हापूर : मल्ल असल्याची ओळख दाखवून कोल्हापुरात राहणाऱ्या कुख्यात गुंडास मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शेराजगबीरसिंग उर्फ मोहित मलिक असे या गुंडाचे नाव आहे. या घटनेने गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील बिस्नोई टोळीचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत आल्याचे स्पष्ट झाले आहे.

 मलिक अनेक दिवसापासून फरारी होता. तो दिल्ली, उत्तराखंड, उज्जैन, इसार अशा ठिकाणी राहत कोल्हापुरात आला होता. येथे उत्तर भारतातील मल्ल भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यानेही आपली मूळ ओळख लपवून मल्ल म्हणून एका भाड्याच्या खोलीत राहत होता. ही माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या पथकाने तपास केला. आज तो रंकाळा तलावावर फिरताना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला पण पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bisnoi gangster mohit malik arrested kolhapur police action ysh

Next Story
पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी प्रयत्न; ९ कोटी निधीस मंजुरी – हसन मुश्रीफ
फोटो गॅलरी