कोल्हापूर

भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याला उपाध्यक्ष पदासह सहा जणांना संधी दिली. भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे आता प्रदेश अध्यक्ष व उपाध्यक्ष अशी दोन्ही पदे असणार आहेत.

pune congress leader aaba bagul
विधानपरिषदेसाठीच आबा बागुल यांची भाजप बरोबर जवळीक ?
Resignation of district president of Vanchit Bahujan Aghadi in Solapur Srishail Gaikwad
सोलापुरात वंचित बहुजन आघाडीला जिल्हाध्यक्षाची सोडचिठ्ठी
karan pawar marathi news, jalgaon lok sabha karan pawar marathi news
भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षप्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाची जळगावमधून उमेदवारी
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

कार्यकारिणीत इचलकरंजी येथील व्यापारी विनोद कांकाणी यांची भाजपा प्रदेश व्यापारी प्रकोष्ठचे अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य तर माजी खासदार धनंजय महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके यांची कायम निमंत्रित सदस्य अशी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर महाडिक बंधूंनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी धनंजय महाडिक यांच्याकडे उपाध्यक्ष होते. आता त्यांना कायम निमंत्रित सदस्यांमध्ये स्थान मिळाले आहे तर सांगलीचे सम्राट महाडिक यांना प्रदेश कार्यकारणी सदस्यपद देण्यात आले आहे.

दरम्यान, बीडच्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रितम मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेल्या चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, राम शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह माजी मंत्री जयकुमार रावल, संजय कुटे, सुरेश हळवणकर यांच्यासह १३ जणांची या पदावर नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. तसेच पक्षाच्या महामंत्रीपदी सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संघटन महामंत्री म्हणून विजय पुराणीक यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच प्रदेश भाजपाच्या मुख्य प्रवक्ते पदी केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली.