कोल्हापूर : लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने शनिवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. देवीची साडी खनाने ओटी भरली. अचानक मंदिरात आलेल्या शिल्पा शेट्टी ला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.मात्र काही क्षणातच ते मंदिरातून पुढील प्रवासासाठी निघून गेली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही रसिकांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत. ते अनेकदा देवदर्शन करतानाही दिसून आलेली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन, सप्तशृंगी देवीचे दर्शन (वणी), शनिशिंगणापूर येथे शनीदेवाचे दर्शन आणि उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला यापूर्वी तिने भेट देऊन देवदर्शन घेतले आहे. पती राज कुंद्रा आणि कुटुंबासोबत दर्शनासाठी ती वारंवार जाते.

वृंदावन येथील बाके बिहारी मंदिर, केदारनाथ वैष्णोदेवी , कामाख्या देवी येथेही शिल्पा शेट्टी यांनी देवदर्शन केलेले आहे. बागेश्वर धामचे वीरेंद्र शास्त्री यांच्या पदयात्रेमध्ये ती सहभागी झाली होती. कलाक्षेत्रात असतानाही अध्यात्माची आवड असलेल्या शिल्पा शेट्टी हिने आज करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. तिच्यासमवेत आमदार प्रसाद लाड, कोल्हापुरातील भाजपचे अनेक नेते , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव होते.

आज दुपारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही प्रसाद लाड यांच्या कुटुंबीयासमवेत खास विमानाने कोल्हापुरात आली . त्यानंतर ती तडक करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात आली. तिने देवीला साडी चोळी अर्पण केली. देवीचे दर्शन घेतल्यानंतर ती भारावलेली दिसून आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, आमदार प्रसाद लाड यांचे स्वागत केले.

कोण आहे शिल्पा शेट्टी?

शिल्पा शेट्टी कुंद्रा ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तिने स्वतःला ‘महाराष्ट्राची मुलगी’ म्हटले आणि मराठीचा आदर दर्शवला होता. १९९३ मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.अभिनयासोबतच ती फिटनेस आणि योग यांसारख्या गोष्टींसाठीही ओळखली जाते. शेट्टीने ९० च्या दशकातील अत्यंत सुंदर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची जडण घडण केली. शिल्पा शेट्टी ही चित्रपटसृष्टीतील त्या निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे जिने स्वतःच्या बळावर करियरमध्ये उंची गाठली आहे. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात एका जाहिरातीपासून केली होती. त्यानंतर हळूहळू तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. तिचे अनेक सिनेमे आणि गाणी सुपरहिट आहेत. शिवाय ती सध्या वेगवेगळ्या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत सुद्धा पाहायला मिळते.