scorecardresearch

‘बीएसएनएल’च्या केबलची चोरी करणारी टोळी जेरबंद

देशभरात ‘बीएसएनएल’च्या केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला असून, नवी दिल्ली येथून एका आरोपीस सोमवारी अटक करण्यात आली.

देशभरात ‘बीएसएनएल’च्या केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावला असून, नवी दिल्ली येथून एका आरोपीस सोमवारी अटक करण्यात आली. त्याच्याकडून ५ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला.
व्हीनस कॉर्नर येथील बीएसएनएलची ४ लाख रुपये किमतीची तांब्याच्या धातूची केबल ५ जुल रोजी चोरीस गेली होती. प्राथमिक तपासात ही चोरी अज्ञात १० ते १२ लोक, वाहतूक रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांचा पेहरावप्रमाणे नाईट जॅकेट घालणाऱ्यांकडून झाल्याचे समजले होते. गाझियाबाद, दिल्ली येथील काही चोरटे अशा प्रकारची चोरी करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे व पथकाने २० जुल रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून महंमद मंजूर आलम याला ताब्यात घेतले होते. त्याने आपला साडू महंमद मंजूर आलम याच्या मदतीने चोरी करत असल्याची कबुली दिली. यावरून महंमद आलम (३८)  याला सोमवारी अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsnl cable stolen gang arrested

ताज्या बातम्या