दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना कमालीची गती आली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सकृद्दर्शनी लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र येथील उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेने दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर धनुष्यबाण निवडणुकीत दिसणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसे झाल्यास निवडणुकीची समीकरणे बदलू शकतात.

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

 भाजपचे संबंधित असलेले उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी गेल्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवली आणि थेट विधानसभेत पोहोचले. दोन वर्षे आमदारकी भूषवली. डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचे आजाराने अकाली निधन झाले. त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील यांचेही या भूमिकेला पाठबळ राहिले. पण शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. 

काँग्रेस पुनरावृत्तीच्या तयारीत

काँग्रेस पक्षाने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात काँग्रेसची उमेदवारी देण्याचा मुद्दा चर्चेत असला त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही. पंढरपूर मतदार संघात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( भगीरथ) भालके घराणे पराभूत झाल्याचा संदर्भ देऊन कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवारी दिल्यास अडचणी येऊ शकतात असा एक निष्कर्ष नोंदवला जात आहे. तर काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वारसादारांनी विजय मिळवला होता, असे सांगून निरुत्तर केले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मविआच्या माध्यमातून पोट निवडणुकींना सामोरे जाण्याचे आणि तिन्ही पक्षांचा मुख्य शत्रू असलेल्या भाजपला पराभूत करणे हे लक्ष्य ठेवले आहे. त्याचप्रमाणे पुढील वाटचाल होईल असाही मुद्दा मांडला जात आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे काँग्रेसला उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसात भेट घेतली जाणार आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यांच्या भूमिकेला पािठबा राहील अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ याच भूमिकेशी जोडले गेल्याचे दिसते.

भाजप यशासाठी उत्सुक

भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी सोमवारी घेतल्या. एकंदरीत कल पाहता गतवेळी काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढवलेले आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे विधानसभेचे संख्याबळ दोनवरून शून्यावर आले आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून खाते उघडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. या निकालाचे निकालाचे परिणाम कोल्हापूर महापालिका निवडणुकीवर होणार असल्याने त्या दृष्टीने हि निवडणूक महत्त्वाची आहे. याच वेळी आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, शेतकरी संघटनेचे राजेश तथा बाळ नाईक अशा काही उमेदवारांनी ताकद जमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

उमेदवारीसाठी चाचपणी   निवडणूक जाहीर झाल्यानंतर रविवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उत्तरची उमेदवारी शिवसेनेला मिळावी अशी ठाम मागणी करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या सातपैकी पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला आहे. काही सव्‍‌र्हेतून काँग्रेसची उमेदवारी अडचणीत असल्याने शिवसेनेला उमेदवारी दिल्यास यश मिळेल असा दावा केला आहे. तर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांकडून शिवसेनेला रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा उल्लेख करतानाच उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे स्पष्ट केले आहे. आता मातोश्रीवरून कोणता कौल मिळतो यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत. मविआतील वारसांना उमेदवारी सोबत राहण्याचा मातोश्रीचा याआधीच्या निवडणुकीतील निर्णय कायम राहतो की कोल्हापूरच्या निमित्ताने त्यात बदल घडतो याचेही कुतूहल आहे.