लोकसत्ता विशेष प्रतिनिधी 

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण हटवताना अधि-यांशी हुज्जत घालून जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दललक्ष्मीपुरी पोलिसांनी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्यासह सहाशेहून अधिक संशयितांवर शनिवारी गुन्हा दाखल केला.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

अलिफ अंजुमन मदरसा आणि सुन्नत जमातीचे अनधिकृत बांधकाम हटवताना बुधवारी परिसरातील महिला,मुस्लिम तरुणांनी विरोध करून मदरशासमोर ठिय्या आंदोलन केले. गाणी आजरेकर यांनी जमावाला चिथावणी देऊन महापालिकेला घेराव घालण्यास फूस लावली. काही तरुण पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते.

हेही वाचा >>>कोल्हापूर : पंचगंगा, भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू, शिरोळ तालुक्यात पंचगंगा कोरडी

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा करून रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये अडथळा आणला. शहरात ठिकठिकाणी तणाव निर्माण होऊन धार्मिक द्वेष वाढल्यामुळे हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.