केंद्र सरकारकडून सुमारे ३० लाख रुपयांचे ‘सीबीएनएटीटी’ मशिन सीपीआरच्या क्षयरोग केंद्रास आहे. या यंत्रणेमुळे कोल्हापुरातच केवळ २ तासांत निदान होईल. या मशिनमुळे प्राधान्याने लहान मुले, एचआयव्ही बाधितांचे निदान होण्यास मदत झाली आहे. या मशिनचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्या हस्ते २२ मार्च रोजी क्षयरोग केंद्रात होणार असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेद्र यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत  सांगितले.
२४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार बठकीत डॉ. हर्षला वेद्रयांनी माहिती दिली. या वेळी राजर्षि शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सबन्नावर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली भाट, डॉ. बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. वेद्र म्हणाल्या, ज्या वेळी क्षयरुग्ण नेहमीच्या औषधोपचाराला दाद देत नाही अशा रुग्णांच्या थुंकीचे नमुने पुण्यास पाठविण्यात येत होते. त्याचा अहवाल १० ते १५ दिवसांनी मिळत असे. आता सीबीएनएटीटी  मशिनमुळे कोल्हापुरातच केवळ २ तासांत निदान होईल. या मशिनमुळे प्राधान्याने लहान मुले, एचआयव्ही बाधितांचे निदान होण्यास मदत झाली आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. बíलन येथे सर रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतुंचा शोध लावला म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. जगातील एकूण क्षयरुग्णांपकी २१ टक्के क्षयरुग्ण भारतात आहेत. प्रतिवर्षी जवळपास १८ लाख नवीन रुग्णांची भर पडते एमडीआर-टीबी या औषधोपचाराला न जुमानणाऱ्या क्षयरोगामध्ये २०१२ ते १६ मार्च २०१६ अखेर १७५ रुग्णांचा समावेश आहे. डॉट्स पद्धतीमुळे क्षयरुग्ण पूर्ण बरा करण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यावर राहते. त्यामुळे सामाजिक धोका कमी होतो. ही पद्धती मोफत व जास्त परिणामकारक आहे. सीबीएनएटीटी  मशिनमुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात निश्चितच वाढ होईल असे  डॉ. वेद्रम्हणाल्या.
क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण सप्ताहमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्लोगन स्पर्धा, नìसग विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, सीपीआर आवारात भव्य रॅली व पथनाटय़, रुग्णांना फळे वाटप, प्राध्यापकांसाठी चर्चासत्र तसेच रॅली असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.