कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानदेशासह जगातील कोणताही हिंदू सहन करणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांनी वक्तव्य करताना विचारपूर्वक केले पाहिजे, असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिला. मंत्री पाटील येथे माध्यमांशी बोलत होते.
पुण्यातील काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक व्हायला नको होती. आंदोलने नेहमी लोकशाही मार्गाने व्हायला हवीत. दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते का समाजकंटक होते, याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण समाजकंटकही फायदा घेतात, अशी टिपणी त्यांनी केली. या देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन प्रश्न तेव्हा संपतील तेव्हा या सर्वांचे महापुरुष एकसमान असतील. त्यांची मातृभूमी समान असेल. टिपू सुलतान हा आमचा आदर्श असू शकत नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली. यावर मंत्री पाटील य म्हणाले, संघाला संपवण्याचा प्रयत्न या देशात अनेकांनी केला आहे. जेव्हा संघ संपवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो खूप वाढते. या देशात हिंदुवरील अन्याय विरोधात संघाने नेहमीच पुढे येऊन काम केले आहे. सर्वसामान्य हिंदूंना देशात संघाबद्दल प्रेम आहे, खरगेंचा मुलगा काय म्हणतो हे फार महत्त्वाचे नाही.
दादा कोल्हापूर पालिकेत
दरम्यान कोल्हापूर महापालिका प्रथमच भाजपच्या महापौर बनलेल्या रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आज पदभार स्वीकारला. कोल्हापूर महापालिकेचे प्रशासन पारदर्शक आणि विकासाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी व्यक्त केला.
सगळ्याच शहरात स्वीकृत नगरसेवक बद्दल प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेकांना संधी देण्यासाठी सव्वा सर्वाचा कार्यकाल निश्चित केले आहे. छोट्या छोट्या समाजाला देखील संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा व्हावा असा आमचा आग्रह आहे. जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी हे दोन शरीर आणि एक आत्मा आहे. त्यामुळे १२ अधिक ६ अशी १८ आकडेवारी आमच्याकडे आहे. त्यामुळे १८आणि २० मध्ये फार फरक रहात नाही. पण सांगलीचं थोडं अवघड आहे. ते सोडवण्यासाठीच मी जात असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंद होईल असा महापौर – उपमहापौरांचा कार्यालय प्रवेशाचा प्रसंग आज आहे. ४० वर्षापासून अनेकांनी आपलं आयुष्य घालवल्यानंतर महापालिकेत भाजपचा महापौर होत आहे त्यामुळे फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी कौतुक म्हणून आलो आहे. महापालिका प्रशासनात ढवळाढवळ करण्याचा कोणताही हेतू नाही. विकास कामात अडथळे निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम नगरसेवकांनी करू नये. त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी खूप निधी देणार आहेत. केंद्राकडून कोट्यावधीचा निधी राज्यातील विविध शहरांसाठी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात आर्थिक संकल्प अर्थमंत्री न मांडता मुख्यमंत्री मांडत आहेत. योगायोग जवळच्या तीन राज्यात मुख्यमंत्री बजेट मांडत आहेत. जयंती नाला, पंचगंगा प्रदूषण, वाहतूक कोंडीसह अनेक प्रलंबित पेंडीग विषयांसाठी मुख्यमंत्र्यांनकडे नियोजनाचे आराखडे आहेत. हद्दवाढ झाल्याशिवाय केंद्राच्या विविध योजनेत आपण येणार नाही.
