सांगली : एनडीएतील कोणाचाही प्रवेशाचा निर्णय बेरीज वजाबाकी पाहून सुकाणू समिती घेते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या एनडीए प्रवेशाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. कोणाला घ्यायचे, कोणाला नाकारायचे यांचा निर्णय सुकाणू समिती निर्णय घेते असे भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील आधुनिक सुविधांचे लोकार्पण केल्यानंतर माध्यमांशी मंत्री पाटील यांनी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा पक्ष किंवा आ. जयंत पाटील यांचा एनडीए मध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले. ते म्हणाले , सध्या आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. कोणाला घ्यायचे किंवा नाही, याबाबतचा निर्णय पक्षाची २० ते २२ जणांची ‘कोर कमिटी’ सर्व बाजूंची बेरीज-वजाबाकी आणि विचार करूनच घेत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीच्या गाठीभेटींवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटे ३ वाजेपर्यंत लोकांना भेटून काम करत असतात आणि प्रशासकीय कामांसाठी रात्रीच्या वेळीही फायली मंजूर केल्या जातात. त्यामुळे ‘रात्री अंधारात का गेले?’ अशा विरोधकांच्या आरोपांना आणि प्रश्नांना काहीही अर्थ नाही. मंत्रिमंडळ विस्तार बाबत अद्याप कसलीही माहिती नाही मात्र ज्या ज्या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो त्या त्यावेळी मंत्र्यांचे गुणपत्रक तपासले जाते आणि काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते.

मी बोलतो कमी करतो जास्त असे सांगत मंत्री पाटील यांनी नम्र होऊन साखर खावा अकाडतांडव करून काही होत नाही असा टोमणा खा. विशाल पाटील यांना लगावला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरातील राम रक्षा आंदोलनावर ते म्हणाले, राम रक्षा म्हणायला कारण लागत नाही, आम्ही रोजच म्हणतो मात्र त्यांना श्रद्धेपेक्षा राजकारण करायचं आहे