खानविलकर बुद्धिबळ स्पध्रेत रेल्वेचा समीर कठमाळे अजिंक्य

अग्रमानांकित पुण्याच्या चिन्मय कुलकर्णीने आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले

बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांचा उद्योगपती प्रवीणभाई शहा यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या वेळी राजलक्ष्मी खानविलकर, विश्वविजय खानविलकर, अनिल राजे, भरत चौगुले, राजेंद्र मकोटे, प्रितम घोडके.
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने व दिग्विजय खानविलकर फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पध्रेत गुरुवारी आंतरराष्ट्रीय मास्टर रेल्वेचा समीर कठमाळेने साडेआठ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. त्याला दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

अग्रमानांकित पुण्याच्या चिन्मय कुलकर्णीने आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले, तर तृतीय क्रमांक मिरजचा मुद्दसर पटेल, चौथा क्रमांक उत्कर्ष लोमटे (कोल्हापूर), पाचवा क्रमांक रवींद्र निकमने (इचलकरंजी) पटकाविले. अपंग बुद्धिबळपटू शैलेश नेल्रेकरने सहाव्या स्थानी झेप घेत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

स्पध्रेचा बक्षीस समारंभ निपाणीचे उद्योगपती प्रवीणभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजलक्ष्मी खानविलकर, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे सहसचिव अनिल राजे, भरत चौगुले, राजेंद्र मकोटे व प्रितम घोडके उपस्थित होते. राजेंद्र मकोटेनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

याचबरोबर पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. सात वर्षांखालील  उत्कृष्ट – प्रथम- गौरव रेंदाळे (जयसिंगपूर), द्वितीय-  अवनीश हंडूर (कोल्हापूर), तृतीय- दिव्या पाटील (जयसिंगपूर). नऊ वर्षांखालील उत्कृष्ट- प्रथम- दिशा पाटील (जयसिंगपूर), द्वितीय- यश भागवत (कोल्हापूर), तृतीय- हर्षतिा काटे (वारणानगर). अकरा वर्षांखालील उत्कृष्ट – प्रथम- वरद आठल्ये (कोल्हापूर), द्वितीय- रोहित बोडके (कारदगा), तृतीय- आर्य मोरे (कोल्हापूर). तेरा वर्षांखालील उत्कृष्ट – प्रथम- शर्वलि पाटील (कोल्हापूर), द्वितीय- आयुष पाटील (कोल्हापूर), तृतीय- सुजल जामसांडेकर (कोल्हापूर). पंधरा वर्षांखालील उत्कृष्ट – प्रथम- अथर्व चव्हाण (कोल्हापूर), द्वितीय- ज्योतीरादित्य जाधव (सातारा), तृतीय- अमृत घाडगे (सातारा).

उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू – प्रथम- मृणालिनी घाडगे (सातारा), द्वितीय- तृप्ती प्रभू (कोल्हापूर), तृतीय- समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर). साठ वर्षांवरील ज्येष्ठ बुद्धिबळपटू – प्रथम- भारत पाटोळे (निपाणी), द्वितीय- आनंद कुलकर्णी (कोल्हापूर) व तृतीय- दादासाहेब गुरव (कोल्हापूर).

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chess competition in kolhapur