मुख्यमंत्री शिंदे यांचे दिल्ली दौरे विकास कामांसाठी; चंद्रशेखर बावनकुळे यांची रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सारवासारव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्लीतील सहापैकी चार दौरे हे विकास कामासाठी झाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांचे दिल्ली दौरे विकास कामांसाठी; चंद्रशेखर बावनकुळे यांची रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सारवासारव
चंद्रशेखर बावनकुळे (संग्रहीत छायाचित्र)

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्लीतील सहापैकी चार दौरे हे विकास कामासाठी झाले आहेत. भाजप नेतृत्वामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही, अशा शब्दात भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची सारवासारव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

देशात महागाई वाढत चालली आहे. हा विरोधकांनी केलेला बागलबुवा आहे. गरिबांवर कोणतेही कर नाहीत. जीएसटीचा त्यांना कोणताही त्रास झालेला नाही, असेही ते म्हणाले. भाजप प्रादेशिक पक्ष संपत असल्याच्या आरोपाचा बावनकुळे यांनी इन्कार केला. बिहारमध्ये कमी जागा असूनही नितेश कुमार यांना मुख्यमंत्री केले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाविकास आघाडीचे ४५ दिवसाचे सरकार असताना केवळ चार निर्णय घेतले. तर विद्यमान सरकारने अल्पकाळात ३२ निर्णय घेऊन कार्यक्षमता सिद्ध केली आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील ओबीसी आरक्षणाचे वास्तव मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उसात काटामारी करून साखर कारखानदारांचा साडेचार हजार कोटींचा दरोडा – राजू शेट्टी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी