कोल्हापूर : काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांचे तुष्टीकरण केले जात आहे. त्यांच्यासाठी कायदे बदलण्याची भूमिका घेतली आहे. अशा प्रवृत्तीच्या काँग्रेसला मत देणे म्हणजे पाप करण्यासारखे आहे, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज काँग्रेसच्या धोरणावर हल्लाबोल चढवला. हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी येथील थोरात चौकात बुधवारी रात्री जाहीर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्यनाथ यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये काँग्रेसवर जोरदार प्रहार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देशाचा सन्मान हरवला होता. दहशतवाद वाढला होता. विकास खुंटला होता. भ्रष्टाचार बोकाळलेला होता. परंतु दहा वर्षाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारने ही प्रतिमा पुसून काढली. आता भारताचा सन्मान वाढला आहे. जगभरात मोदींचा सन्मान केला जात आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचे काम मोदींनी केले आहे. परंतु काँग्रेस आपली मूळ प्रवृत्ती सोडायला तयार नाही.

आणखी वाचा-ठाकरेसेनेच्या कोल्हापूर जिल्हा उपप्रमुखपदी महेश बोहरा; महादेव गौड पदमुक्त केल्याची पक्षाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या मध्ये राम मंदिर साकारले. परंतु काँग्रेस मूळ प्रवृत्ती सोडायला तयार नाही राम मंदिर बांधण्यापूर्वी ते याची गरज काय म्हणत होते. आणि राम मंदिर साकारल्यानंतर राम तर सगळ्या देशाचा आहे असे म्हणू लागले आहेत. काँग्रेसची ही दुटप्पी नीती लोकांनी ओळखून धडा शिकवला पाहिजे.

काँग्रेस पक्षाने नेहमी खोटी स्वप्ने दाखवली. जनता त्याला बळी पडत राहिली . पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी देशातील गरिबी हटवणार असे म्हणत राहिल्या. आता त्यांचा नातू राहुल गांधी देशातील गरिबी दूर करणार असे सांगत आहे. गरिबी कशी दूर करणार असे विचारले तर देशातील संपत्तीचे फर मूल्यमापन करून ते मुस्लिमांना वाटणार अशी त्यांचे नेते म्हणत आहेत. भारताचे इस्लामीकरण, तीन तलाक धोरण पुन्हा आणण्याच्या प्रवृत्तीला लोक स्वीकारणार नाही. मोघलांचे वारस असणारे आता देशात रिक्षा चालवत फिरत आहेत. आणि काँग्रेस मात्र औरंगजेबाचा जिझिया आकार लावत आहे. भारतात हा कर कधीच लागणार नाही. उलट येथे नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा कल्याणकारी योजना राबवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-ठाकरे सेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांचा पक्षाला रामराम; शिंदे सेनेत प्रवेश करणार

आत्मनिभर भारत ,विकसित भारत याचे स्वप्न दाखवून ते प्रत्यक्षात साकारणारे मोदी सरकार लोकांना हवे आहे. उत्तर प्रदेश मध्ये आम्ही 80 जागा जिंकून दाखवू. महाराष्ट्रातील हे काम करून महायुतीच्या सर्व जागा जिंकून आणाव्यात ,असे आवाहन त्यांनी केले. या सभेला उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने , माजी मंत्री सदाभाऊ खोत , माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हस, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने , पुंडलिक जाधव, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नीलिमा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister yogi adityanath criticize congress in kolhapur mrj
First published on: 01-05-2024 at 22:08 IST