scorecardresearch

कोल्हापुरात औषध दुकानात सीसीटीव्ही बसविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

किरकोळ औषध विक्रेत्याने उल्लंघन केल्यास कायद्यातील तरतुदींप्रमाणे दिवाणी अथवा फौजदारी कारवाई करण्यात येईल

install CCTV in drug shops in Kolhapur
कोल्हापुरात औषध दुकानात सीसीटीव्ही बसविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गुंगीकारक औषधांच्या अवैध विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ औषध दुकान चालकांनी दुकानांमध्ये एक महिन्याच्या आत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत, असा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिला आहे. सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्याचे फुटेज आवश्यकतेप्रमाणे औषध निरीक्षक, बालकल्याण पोलीस अधिकारी,शासन अथवा जिल्हादंडाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी,कर्मचारी यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा- कोल्हापूर: धामणी प्रकल्पासाठी शक्तिशाली भूसुरुंगाचा वापर, घरांना तडे; उद्या मंगळवारी बैठक

तर कायदेशीर कारवाई

याबाबींचे पालन करुन घेण्याची जबाबदारी सहायक आयुक्त (औषधे) जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन यांची राहील. आदेशाची किरकोळ औषध विक्रेत्याने उल्लंघन केल्यास कायद्यातील तरतुदींप्रमाणे दिवाणी अथवा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 17:20 IST