कोल्हापूर : कागल तालुक्यात एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय३०,रा. गोटखिंडी ता. वाळवा,सांगली) असे या तरुणाचे नाव आहे.
कागल-निढोरी राज्य मार्गावर गोटखिंडी येथील तरुणास बामणी हद्दीत मारून शेतात मृतदेह आणून टाकला आहे. कागल पोलिसांना पंचनामा करताना या तरुणाच्या खिशात वाहन परवाना सापडला. त्यावरून तरुणाचे नाव समजले. कोल्हापूर
रात्री साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी एक मोटार थांबल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. याचवेळी हा मृतदेह या गाडीतून शेतात टाकला असण्याची शक्यता आहे.
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.