कोल्हापुरात भाजप महिला आघाडीची पदाधिकारी विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार | Complaint to Minister Chandrakant Patil against office bearers of BJP in Kolhapur amy 95 | Loksatta

कोल्हापुरात भाजप महिला आघाडीची पदाधिकारी विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या विरोधात शहरातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली.

कोल्हापुरात भाजप महिला आघाडीची पदाधिकारी विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार
कोल्हापुरात भाजप महिला आघाडीची पदाधिकारी विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या विरोधात शहरातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली. याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी त्यांना आश्वस्त केले.

हेही वाचा >>> कोल्हापुरात ‘शह-काटशह’चे राजकारण ; जिल्हा सहकारी बँक पोटनियम दुरुस्तीचे निमित्त

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांचे व्याख्यान येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री पाटील हे कार्यक्रमस्थळा वरून मोटारीतून अन्य ठिकाणी निघाले होते. याचवेळी भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांच्या विरोधात निवेदन देऊन त्यांनी अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी केल्या.त्यावर पाटील यांनी भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्याचे पालन केले पाहिजे. पक्षांतर्गत मतभेदाचे उघडपणे निवेदन देणे अयोग्य आहे. घरातील भांडणे घरात मिटवली जातात हे समजले पाहिजे. मला याबाबतची माहिती आहे. लवकरच याबाबत एकत्र बसून बोलू, असे त्यांनी आश्वस्त केले.

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी शक्य ;  अन्यत्र साखर कारखान्यांची आर्थिक अवस्था बिकट

गटबाजीची चर्चा
व्याख्यानावेळी भंडारी यांनी सांघिकपणे पक्ष वाढवण्याचे आवाहन केले होते. पण ते संपून काही मिनिटे होतात न होतात तोच भाजपमधील गटबाजी भर रस्त्यावर उफाळून आल्याने त्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील व्हीआयपी दर्शन, पेड पासला न्यायालयाची स्थगिती; सोमवारी अंतिम निर्णयाची शक्यता

संबंधित बातम्या

प्रकाश आबिटकर मागे फिरा अन्यथा शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल – अरुण दुधवडकर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”
Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली