“कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी…”, सतेज पाटलांचं महाडिकांना आव्हान

“बंटी पाटील पॅनलमध्ये नसला, तरी माझे २१ उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही”

satej patil
"कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी…", सतेज पाटलांचं महाडिकांना आव्हान

श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेतली होती. त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. यानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना आव्हान दिलं आहे.

“आपण लोकांच्यात जावूया. लोकांना पटवून देऊया की महाडिक किती भ्याड आहेत. १२ हजार लोकांना भिवून २७ जणांना बाजूला करण्याचा प्रयत्न होता. लांग घातली होती, तर कुस्ती खेळायची होती, आम्ही काय गप्प बसलो होतो का? मैदानात यायच्या आधीच महाडिकांनी पळ काढला,” असा हल्लाबोल सतेज पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा : “गौतम अदाणींसाठी पंतप्रधान १८-१८ तास काम करतात”, काँग्रेसची मोदींवर घणाघाती टीका

“एवढी खुमखूमी, ताकद आणि सभासदांचा चांगला कारभार केला आहे, तर मैदानात या. उद्याच्या उद्या मैदानात या आणि आमच्या सगळ्या पट्ट्यांना सामोरे जावा. बंटी पाटील पॅनलमध्ये नसला, तरी माझे २१ उमेदवार तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. माझा लढा स्वत:साठी नव्हता. गोकुळमध्ये मी संचालक कधी झालो नाही. तुम्ही गोकुळमध्ये तुमच्या कुटुंबातील माणसं बसवलीत,” अशी टीका सतेज पाटील यांनी महाडिकांवर केली आहे.

“महाडिकांच्या घरातील व्यक्तींनी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घ्यावी. उमेदवारांमध्ये लढाई होऊद्या. २१ संचालक कोण असणार याचा निर्णय १२ हजार सभासदांना घेऊद्यात. कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील कधी मागं पडणार नाही,” असं आव्हान सतेज पाटील यांनी महादेव महाडिकांना नाव न घेतला दिलं आहे.

हेही वाचा : “वीर सावरकरांनी शिवराय आणि संभाजी महाराजांबद्दल केलेलं लिखाण मान्य आहे का?”, काँग्रेसचा भाजपाला सवाल

“आज रडीचा डाव खेळला. चांगलं केलं, रडीचा डाव खेळला. मी १४ तास राबणार होतो. आता २४ तास राबणार. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे. हा कोणा एकट्याच्या मालकीचा होता काम नये. ही बंटी पाटील आणि १२ हजार सभासदांची भूमिका आहे,” असं सजेत पाटील यांनी म्हटलं.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 19:39 IST
Next Story
‘सावरकर गौरव यात्रे’वरून खासदार अमोल कोल्हेंचं भाजपा-शिंदे गटावर टीकास्र; म्हणाले, “अशी यात्रा काढल्याने…”
Exit mobile version