कोल्हापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास या प्रश्नावर शनिवारी कोल्हापूरजवळील किणी टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. ‘टोल नाही-टोला द्या, रस्ता नाही-टोल नाही’अशा घोषणा देत जोरदार आंदोलन केले. यावेळी २५ टक्के टोल माफ केला असून आणखी २५ टक्के टोल माफ करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते मंत्रालयाशी चर्चा करून घेतला जाईल, असे पत्र महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे ते कागल -कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालीची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे टोल आकारणीचा हक्क गमावला आहे, अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी किणी टोल नाक्यावर टोल आकारणीस विरोध केला.

हेही वाचा…पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे चार टोल नाक्यांवर आंदोलन सुरू; टोल आकारणीस विरोध

महामार्गावर जमलेली सर्व वाहने टोलची रक्कम न घेता सोडावीत, असा आग्रह त्यांनी धरला. ऋतुराज पाटील, राजू आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर या आमदारांनी महामार्ग दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.