वार्षिक सभेपाठोपाठ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीलाही बुधवारी वादाचे ग्रहण लागले आहे. महामंडळाचे मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी अद्यापही आपणच अध्यक्ष असल्याचा दावा करून आज चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर केली. मात्र, राजेभोसले यांनी जाहीर केलेला निवडणूक अवैध असल्याचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता निवडणुकीच्या वादाचा कलगीतुरा रंगू लागला आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत संपून दीड वर्षे झाली आहे. सहा वर्षांपूर्वी निवडणूक झाल्यानंतर महामंडळाचा तसेच पहिले अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा कारभार कायमच वादग्रस्त ठरला होता. २६ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजेभोसले यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता त्यांच्या पाठीशी खजाणी संजय ठुबे चैत्राली डोंगरे शरद चव्हाण विजय खोळेकर हे संचालक होते यांच्या विरोधात उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, वर्षा उसगावकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, सतीश बिडकर, निकिता मोघे, रणजीत जाधव हे संचालक होते. तर २२ जून रोजी संचालकांची बैठक होऊन अध्यक्षपदी अभिनेते सुशांत शेलार यांची बहुमताने निवड करण्यात आली.

Chandrapur Lok Sabha Constituency, Conclude Campaign, congress two big sabha, narendra modi meeting, big leaders public meeting, bjp oraganise actors road show, lok sabha 2024, election 2024, marathi news,
चंद्रपुरात काँग्रेसच्या केवळ दोन प्रचारसभा; भाजपकडून दिग्गज नेते, अभिनेते-अभिनेत्री…
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
Sanjay Nirupam
ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम बंडखोरीच्या पवित्र्यात? काँग्रेसला इशारा देत म्हणाले…
मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

२० नोव्हेंबरला मतदान

तरीही आज राजेभोसले यांनी आपणच अध्यक्ष असल्याचा दावा करून अध्यक्षांना मिळालेल्या अधिकारानुसार चित्रपट महामंडळाच्या महामंडळाची २०१७-२३ पंचवार्षिक निवडणूक पत्रकार परिषदेत जाहीर केली. २० नोव्हेंबर रोजी निवडणूक, २२ रोजी कोल्हापूर येथे मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एडवोकेट प्रशांत जीवनराव पाटील, कोल्हापूर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. समितीत निवडणूक अधिकारी म्हणून प्रताप परदेशी पुणे, आकाराम पाटील कोल्हापूर, शहाजीराव पाटील पुणे व सुनील मांजरेकर मुंबई यांचा समावेश आहे.

सर्व जागा जिंकू – राजेभोसले

घटनाबाह्यरित्या ठराव करून सभासदांमध्ये विनाकारण संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या अभिनेता सुशांत शेलार, उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव या तिघांचाही महामंडळाच्या आगामी निवडणुकीत डिपॉझिट जप्त करू. आपल्या नेतृत्वाखाली सर्व १७ जागा जिंकू अन्यथा अध्यक्ष होणार नाही, असे खुले आव्हान राजेभोसले यांनी विरोधकांना दिले.

निवडणूक बोगस

दरम्यान, राजेभोसले यांनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम विरोधकांनी अमान्य असल्याचे सांगितले. अध्यक्ष सुशांत शेलार यांनी गेल्या सहा वर्षात केवळ दोन वेळा वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आहे. राजेभोसले यांच्या काळातील आर्थिक कारभार वादग्रस्त आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घडली आहेत. याचे उत्तर त्यांनी वार्षिक सभेत देणे अपेक्षित असताना त्यातून पळ काढून जाहीर केलेली निवडणूक अमान्य आहे. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत व त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर व्हावा लागतो. ही कायदेशीर प्रक्रिया पार न पडता परस्पर कोणालाही विश्वासात न घेता निवडणूक जाहीर केली आहे, अशी प्रतिक्रिया ‘ लोकसत्ता ‘शी बोलताना व्यक्त केली. तर उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी निवडणुकीचा जाहीर केलेला कार्यक्रम बोगस आहे. मुळात राजेभोसले हे अध्यक्ष नसल्याने त्यांना निवडणूक जाहीर करता येत नाही. उद्या सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आजचा घटनाक्रम पाहता चित्रपट महामंडळाची निवडणुकीची ही ठिणगी उडाली असून निवडणूक होणार की नाही याबद्दलच साशंकता निर्माण झाली आहे.