कोल्हापूर : कापसाचे दर वाढल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन साठेबाजी केली आहे. आता ते जास्त दरात विकत आहेत. जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य व केंद्र सरकारने धाडी टाकून उपलब्ध कापूस, साठवणुकीचा कापूस रास्त भावात खुल्या बाजारात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य वस्त्रोद्योग सहासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सोमवारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गत वर्षी भारतात कापसाचे उत्पादन कमी झाल्याने कापसाचे दर भरमसाट वाढले. याचा फायदा कापूस व्यापाऱ्यांनी घेतला. यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असताना त्याकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका सूतगिरण्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. सध्या कापसाचा दर १ लाख १० हजार प्रति खंडी असा आहे. या दराने जरी कापूस घ्यायचा म्हटले तरी व्यापारी कापसाची उपलब्धता अल्प आहे असे सांगून सूतगिरण्यांना नागवत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand action against cotton stockists merchants farmers conscious scarcity ysh
First published on: 26-05-2022 at 00:02 IST