कोल्हापूर : गारगोटीतील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी गायरान जमिनीतील जागा मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या जागेच्या हस्तांतर नस्तीवर सही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी १० लाख रुपयाची मागणी केली आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा सदस्य नाथाजी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी हा प्रश्न आठ दिवसांमध्ये मार्गी न लावल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

गारगोटीत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून वितरण नलिकाअंतर्गत नळ जोडणी, चार लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आदी ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी गट क्रमांक २३५ मध्ये वीस गुंठे जागा मिळावी, अशी मागणी दीड वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या मागणीची फाईल अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे प्रलंबित आहे. पालकमंत्र्यांनी ही जागा लवकर हस्तांतरित करावी, अशी सूचना त्यांना दिली आहे.

female ias officers in maharashtra ias officer sujata saunik controversial ias officer pooja khedkar
उथळ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश!
mla dr deorao holi complaint ias officer shubham gupta to chief minister
अखेर ‘त्या’ वादग्रस्त आयएएस अधिकाऱ्याची चौकशी होणार, आमदाराच्या तक्रारीवरून दोन वर्षानंतर…
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
IAS Praful Desai Photos
पूजा खेडकरांनंतर प्रफुल देसाई वादात, खोटी प्रमाणपत्रं देऊन अधिकारी झाल्याचा आरोप, म्हणाले; “आयुष्य जगणं…”
Abhishek Singh former IAS Officer
Abhishek Singh : पूजा खेडकरांप्रमाणेच आणखी एक माजी IAS अधिकारी अपंगत्वाच्या दाखल्यावरून चर्चेत! डान्स आणि जिमच्या व्हिडीओमुळे गोत्यात?
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Two arrested in bribery case along with Naib Tehsildar in Mangalvedha
मंगळवेढ्यात नायब तहसीलदारासह दोघे लाच प्रकरणात जेरबंद, उपविभागीय अधिकाऱ्याचीही होणार चौकशी
IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

हेही वाचा – सोलापूर : हरी नामाचा गजर, फुलांची उधळण करून माउलींच्या पालखीचे स्वागत, पहिले गोल रिंगण उद्या पुरंदवडे येथे

हेही वाचा – दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंना मुंबई पोलिसांची नोटीस; १२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश!

जागा हस्तांतरित करण्यामध्ये शिंदे यांनी टाळाटाळ चालवली असून त्यांनी यासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप नाथाजी पाटील यांनी केला. याबाबत महसूल मंत्र्यांकडे तक्रार केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी माजी उपसरपंच सचिन देसाई, ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगुले, राहुल जाधव, प्रा. धनाजी तोरस्कर उपस्थित होते.