कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर गुरुवारी निदर्शने केली. वारंवार मागणी करूनही राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, मासिक पेन्शन, आजारी रजा, नवीन मोबाइल, मराठी ट्रॅकर ॲप, अंगणवाडी केंद्राचीच्या भाडय़ात वाढ इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदेलन करण्यात आले.

यापूर्वीही या प्रश्नांवरून अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज पुन्हा १६ विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सचिव शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.