उपमुख्यमंत्री पवार यांचा कोल्हापूर पाहणी दौरा रद्द

खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर उडवण्यात अडचणी असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर जिल्हा महापूर पाहणी दौरा सोमवारी रद्द झाला.

ajit pawar ,Corona review meeting pune
उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर उडवण्यात अडचणी असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर जिल्हा महापूर पाहणी दौरा सोमवारी रद्द झाला. पुणे—बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यानंतर दुपारनंतर ते कोल्हापूरला येणार असल्याची चर्चा होती, पण तसे घडले नाही.

पवार हे पश्चिम महाराष्ट्राच्या महापूर पाहणीची सुरुवात कोल्हापुरातून आज सकाळी करणार होते. सकाळी १० वाजेपर्यंत पूरग्रस्त परिसर पाहणी-पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट. शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यतील पूरग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक. दत्त शेतकरी सहकार साखर कारखाना हेलिपॅडवर आगमन आणि शिरोळ परिसर पूरग्रस्त पाहणी करून दुपारी सांगलीकडे प्रयाण असा त्यांचा दौरा होता. खराब हवामानामुळे तो रद्द करावा लागला. तीन आठवडय़ापूर्वी पवार कोल्हापुरात करोना आढावा बैठकीसाठी आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deputy chief minister pawar visit to kolhapur canceled ssh