scorecardresearch

Premium

‘लाख’मोलाची लाच स्वीकारताना कोल्हापुरात जिल्हा क्रीडा अधिकारी जाळ्यात

तक्रारदार हे सरकारी विभागास साहित्य पुरवठा करतात. त्यांनी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑनलाइन महा टेंडर वरून निविदा भरून क्रीडा साहित्य पुरवले होते.

district sports officer arrested while accepting bribe
प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : क्रीडा साहित्याचे बिल मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांची १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी येतील जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्ग एक यांना मंगळवारी प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (रा.  विश्रामबाग सांगली) असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार हे सरकारी विभागास साहित्य पुरवठा करतात. त्यांनी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑनलाइन महा टेंडर वरून निविदा भरून क्रीडा साहित्य पुरवले होते. या साहित्याचे एकूण ८ लाख ८९ हजार रुपये बिल झाले होते. ते मंजूर करण्यासाठी साखरे यांनी बिलाच्या १५ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती  ठरलेली २ लाख १० हजार रुपये ही रक्कम आज सायंकाळी कार्यालयात स्वीकारत असताना साखरे हे पकडले गेले. त्यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

rpi athwale group workers dressed in school uniform for protest
सातारा:शालेय गणवेशात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा; सांग सांग एकनाथ शाळा टिकेल काय म्हंटली कविता
shetkari sangh march at collector office in kolhapur
शेतकरी संघाचे अधिग्रहण मागे घेण्यासाठी कोल्हापुरात मोर्चा; राज्य शासन,पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी
Banana producers in Jalgaon flood victims
जळगावातील केळी उत्पादक विमाधारकांसह पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे निवेदनरूपी केळी पान जिल्हाधिकार्‍यांना सुपूर्द
lavani dance before the annual general meeting of sangli district bank zws
सांगली : जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा बँकेत लावण्या, भोजनावळचं आयोजन

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: District sports officer arrested while accepting bribe of rs 1 lakh and 10 thousand zws

First published on: 03-10-2023 at 22:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×