कोल्हापूर : नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने या वर्षी देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही वापर करण्यात येणार आहे. या ड्रोन कॅमेऱ्याचे शनिवारी अनावरण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्रीमध्ये कोल्हापूर तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांचा आधार घेण्यात येत आहे. देवस्थानच्या  सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप, अभिजित पाटील यांनी यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. ड्रोन अनावरणप्रसंगी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, जुना राजवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, प्रशांत गवळी व देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone mahalakshmi temple area vigilance occasion navratri festival ysh
First published on: 25-09-2022 at 00:29 IST