scorecardresearch

ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणी

ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहे.

शाहू कारखान्यामार्फत ऊस पिकावर ड्रोनतंत्राद्वारे फवारणीच्या प्रात्यक्षिकवेळी समरजितसिंह घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, अमरसिंह घोरपडे, जितेंद्र चव्हाण, सुभाष जमदाडे आदी.

शाहू कारखान्याची सुविधा

कोल्हापूर : ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ड्रोन तंत्रास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे शाहू सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना ड्रोनची ही सुविधा उपलब्ध करून देत आहे, अशी घोषणा शाहू समूहाचे नेते, भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शनिवारी केली. शाहू कारखान्यामार्फत कागल येथे ऊस पिकावर ड्रोनतंत्राद्वारे फवारणीचे जिल्ह्यातील पहिले प्रात्यक्षिक समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आले. कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक वीरकुमार पाटील, अन्य संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी घाटगे म्हणाले, कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग राबवण्यात येत आहेत. ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. उंच वाढलेल्या ऊस पिकात मजुरांकरवी फवारणी करता येत नाही. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांना या फवारण्या वेळेत घेता येत नाहीत. यावर पर्याय म्हणून ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. शाहू साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना याची सुविधा उपलब्ध करीत आहोत. चातक इनोवेशनचे कार्यकारी संचालक सुभाष जमदाडे यांनी ड्रोन तंत्रामुळे पारंपरिक फवारणीच्या तुलनेत खर्चासह सर्वच बाबतीत होणारे फायदे विषद केले. स्वागत ऊस विकास अधिकारी के. बी. पाटील यांनी केले. संचालक यशवंत माने यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drone spraying sugarcane crop ysh