सांगली : सांगली शहरातील अत्यंत गर्दी असलेल्या लोकमान्य टिळक चौकात मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना ठोकले. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत काही नागरिक जखमी झाले. संतप्त नागरिकांनी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम चोप दिला व मोटारीची मोडतोडही केली.
सांगलीत सरकारी घाटावर कृष्णामाई उत्सव सुरु असून तो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ टिळक चौकात होती. अशा गर्दीत एक इनोव्हा मोटार वेगाने गर्दीत शिरली.
यामुळे सांगलीतील टिळक चौकात हिट अँड रनचा थरारक प्रकार घडला. गणपती मंदिरापासून टिळक चौका पर्यंत एका इनोव्हा गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले दाखल आले आहे.
संतप्त नागरिकांनी चालकाला मोटारीतून बाहेर ओढून बेदम चोप दिला. मोटारीची मोडतोड करण्यात आली. नागरिकांच्या मारहाणीत चालकाला रक्तबंबाळ स्थितीत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

