scorecardresearch

कोल्हापूर : धामणी नदीवरील मातीचा बंधारा रविवारी फुटला; शेतकरी चिंतेत

पाटबंधारे खात्याच्या पाणी नियोजनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

कोल्हापूर : धामणी नदीवरील मातीचा बंधारा रविवारी फुटला; शेतकरी चिंतेत
धामणी नदीवरील बळपवाडी येथील मातीचा बंधारा फुटला.

धामणी नदीवरील बळपवाडी येथील मातीचा बंधारा शनिवारी फुटला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.धामणी खोऱ्यामध्ये मातीचे काही बंधारे आहेत. अंबर्डे (तालुका पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात उपसा बंदी लागू करण्यात आली होती. पाणी उपसा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

हेही वाचा- ‘आधी सीमाप्रश्नावर बोला, मग समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सीमावादावरून…”

येथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. त्याचा दाब वाढल्याने बळपवाडी (तालुका राधानगरी ) व गवरी पाटीलवाडी (तालुका राधानगरी) यादरम्यान असलेला मातीचा बंधारा आज फुटला. त्यातील पाणी मुसंड्याने वाहू लागले. आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पसरले. पसरलेल्या पाण्यामध्ये शेत पंपाच्या मोटारी बुडाल्या. पाटबंधारे खात्याच्या पाणी नियोजनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने पुढील काळात पीक- पाण्याचे नियोजन कसे करायचे याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:30 IST

संबंधित बातम्या